Independence Day: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकन गायिका गाणार 'राष्ट्रगीत'

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच हॉलिवूडचा सेलिब्रिटी देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी
Mary Millben
Mary Millbenesakal

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच हॉलिवूडचा सेलिब्रिटी देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होऊन भारताचे राष्ट्रगीत गाणार आहे. माहिती देताना इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनने म्हटले आहे की, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकन-आफ्रिकन गायिका मेरी मिलबेन उपस्थित राहणार असून त्या भारताचे राष्ट्रगीतही गाणार आहेत.

15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, यावेळी सर्वात भव्य कार्यक्रम होणार आहे, कारण ते स्वातंत्र्याचे अमृतवर्ष आहे. ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या खास प्रसंगी हॉलिवूड गायिका मेरी मिलबेनला आमंत्रित करण्यात आले आहे. लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात त्या 'ओम जय जगदीश हरे' आणि 'जन गण मन' गातील.

मेरी मिलबेन करणार अमेरिकेचे प्रतिनिधित्व

ICCR ने सांगितले आहे की, मेरी मिलबेन भारताची अधिकृत पाहुणी असेल आणि तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच भारतात परफॉर्म करेल, मेरी मिलबेन ही पहिली अमेरिकन कलाकार आहे ज्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त परफॉर्म करण्याची संधी मिळत आहे. मेरी मिलबेन अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Mary Millben
Independence Day: 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन

मेरी मिलबेन यांनी आनंद व्यक्त केला

लाइव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी भारतात आल्यावर मेरी मिलबेन म्हणाल्या – भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाला उपस्थित राहण्यासाठी 1959 मध्ये भारताला भेट देणाऱ्या डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या पावलावर पाऊल ठेवत मला खरोखर अभिमान वाटतो.

अशा मौल्यवान मातृभूमीचा अनुभव घेण्यासाठी आणि जगभरातील भारत आणि भारतीय समुदायासोबतचे आमचे चांगले संबंध साजरे करण्यासाठी यूएसए आणि भारत यांच्यातील महत्त्वाची लोकशाही युती आणखी मजबूत करताना मला आनंद होत आहे. मेरी मिलबेनही लखनऊला भेट देणार आहेत. मेरी मिलबेन म्हणाल्या की मी माझ्या भारताच्या पहिल्या प्रवासाबद्दल खूप उत्साहित आहे. मला डॉ. किंगचे शब्द पुन्हा सांगायचे आहेत "इतर देशांमध्ये मी पर्यटक म्हणून जाऊ शकते, परंतु भारतात मी यात्रेकरू म्हणून येते" दिल्लीत त्यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर मेरी मिलबेन उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊलाही जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com