
भारत सरकारने अखेर बहुप्रतीक्षित जनगणना 2027 साठी पाऊल उचलले आहे. यावेळी प्रथमच जातीची गणना देखील केली जाणार आहे. गृह मंत्रालयाने (MHA) दिलेल्या माहितीनुसार, ही जनगणना लडाखसारख्या हिमाच्छादित भागात 1 ऑक्टोबर 2026 रोजी, तर देशाच्या उर्वरित भागात 1 मार्च 2027 रोजी सुरू होईल. या जनगणनेत भारतीय कुटुंबांचे सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करण्यासाठी 36 प्रश्न तयार करण्यात आले आहेत. हे प्रश्न कुटुंबांचे उत्पन्न, शिक्षण, जीवनशैली आणि मूलभूत सुविधांबाबत माहिती संकलित करतील.