India Aghadi : जागावाटपासाठी तारीख निश्चित नाही; ‘इंडिया’ आघाडीबाबत काँग्रेसने केली भूमिका स्पष्ट

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांशी जागावाटपाच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी कोणतीही अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली नसल्याचे आज काँग्रेसने स्पष्ट केले.
India Aghadi
India AghadiSakal
Updated on

नवी दिल्ली - विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांशी जागावाटपाच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी कोणतीही अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली नसल्याचे आज काँग्रेसने स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपाचा घोळ सुरू आहे. उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, पंजाब व दिल्ली या राज्यांमध्ये काँग्रेसला घटक पक्षांशी तडजोड करावी लागणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अद्यापही काँग्रेसच्या पातळीवरच चर्चा असल्याचे सांगितले.

काँग्रेसने राष्ट्रीय आघाडीसाठी समितीचे गठन केले आहे. ही समिती आता घटक पक्षांच्या नेत्यांशी किंवा पक्षांतर्फे नियुक्त होणार्या व्यक्ती संबंधित पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

यात्रेचा प्रचाराशी संबंध नाही

जागावाटपासाठी अंतिम निर्णय घेण्यासाठी कोणतीही एक तारीख निश्चित केलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घटक पक्षांना विश्वासात घेऊन या वाटाघाटी होणार आहे. कॉग्रेसची न्याय यात्रा व लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ११० लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. याचा अर्थ या सर्व मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार राहतील, असे नाही. या यात्रेचा उद्देश न्याय, स्वातंत्र, समानता व बंधुभाव देशात प्रस्थापित करणे हा आहे. या राज्यघटनेतील चार तत्वावर ही यात्रा राहणार आहे. याचा लोकसभा प्रचाराशी संबंध राहणार नाही.

परंतु लोकांचे या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकशिक्षण या यात्रेतून होणार हे निश्चित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल व काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख खासदार जयराम रमेश उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The India Story  Slow Poison in Progress
Pune
Sakal India Foundation
Uddhav Thackeray INDIA Alliance latest news
Marathi News Esakal
www.esakal.com