INDIA: इंडिया आघाडीकडून न्यूज अँकर्सवर बहिष्काराचा निर्णय; अर्णव गोस्वामी, सुधीर चौधरीसह 14 जणांचा समावेश

india alliance
india alliance
Updated on

नवी दिल्ली- इंडिया आघाडीने काही विशिष्ट न्यूज शोवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंडिया आघाडीने न्यूज शो घेणाऱ्या अँकर्सची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, 'इंडिया आघाडीचे नेते काही माध्यम संस्थांच्या न्यूज अँकर्सच्या शोमध्ये जाणार नाहीत. त्याची यादी जाहीर करण्यात येत आहे.' ( INDIA alliace will Bloc Boycott TV Anchors)

काही माध्यम संस्था पक्षपाती बातम्या दाखवतात. तसेच त्यांचे वार्तांकन पक्षपाती असते. काही न्यूज अँकर्स त्यांचा स्वत:चा अजेंडा राबवतात. ते इंडिया आघाडीची बदनामी करत असून भाजपचे उद्दातीकरण करत आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळे काही न्यूज अँकर्सवर बहिष्कार टाकले जाणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आलीये.

india alliance
PM Modi: इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत सनातन धर्म नष्ट करण्याचा संकल्प झाला; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

इंडिया आघाडीच्या यादीत कोणत्या अँकर्सचा समावेश:

  1. अदिती त्यागी (भारत एक्सप्रेस)

  2. अमन चोप्रा (नेटवर्क १८)

  3. अमिश देवगण (न्यूज18)

  4. आनंद नरसिंहन (CNN-News18)

  5. अर्णब गोस्वामी (रिपब्लिक टीव्ही)

  6. अशोक श्रीवास्तव (डीडी न्यूज)

  7. चित्रा त्रिपाठी (आज तक)

  8. गौरव सावंत (आज तक)

  9. नाविका कुमार (टाइम्स नाऊ/टाईम्स नाऊ नवभारत)

  10. प्राची पाराशर (इंडिया टीव्ही)

  11. रुबिका लियाकत (भारत २४)

  12. शिव आरूर (आज तक)

  13. सुधीर चौधरी (आज तक)

  14. सुशांत सिन्हा (टाईम्स नाऊ नवभारत)

भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीमध्ये देशातील २९ पक्षांचा समावेश आहे. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका देशभरात झाल्या आहेत. इंडिया आघाडीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी आणि जागावाटपाच्या मुद्द्याबाबत पुढील बैठक भोपाळमध्ये घेतली जाण्याचे जाहीर केले आहे. मुंबईतील बैठकीत इंडिया आघाडीची ऐकी पाहायला मिळाली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com