
नवी दिल्ली : बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणीच्या मुद्द्यावर मोदी सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप करत येत्या सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढण्याची आज घोषणा केली. हा मोर्चा संसद भवनापासून निर्वाचन सदनापर्यंत काढण्यात येईल.