
भारताने उरी, पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यांचा बदला त्वरित आणि ठोस कारवायांद्वारे घेतला. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकसारख्या ऑपरेशन्सनी भारताच्या लष्करी सामर्थ्याची झलक दाखवली, तर कूटनीतिक पावलांनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवला. हा बदला पॅटर्न भारताच्या ‘शून्य सहिष्णुता’ धोरणाचे प्रतीक आहे, जे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत देशाची बांधिलकी दर्शवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्यांना नेहमी चोख उत्तर दिले आहे. उरी, पुलवामा, पहलगाम बदल्याचा मोदींचा पॅटर्न नेमका कसा आहे, अशी चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगली आहे.