

Zojila Tunnel Project
sakal
New Delhi: हिमालयाच्या उंचच उंच पर्वतरांगा, कडाक्याची थंडी आणि प्रचंड बर्फवृष्टी... अशा आव्हानात्मक परिस्थितीत भारत एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे. आशिया खंडातील सर्वांत लांब बोगद्याच्या प्रकल्पांपैकी एक असलेला झोजिला बोगदा आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तब्बल १३ किलोमीटरहून अधिक लांबीचा हा बोगदा सुरू झाल्यानंतर काश्मीर आणि लडाखमधील प्रवासाचे चित्र बदलणार आहे.