तब्बल दोन वर्षांनंतर भारत-बांगलादेश क्रॉस-बॉर्डर बससेवा पुन्हा सुरू I Bus Service | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India-Bangladesh Bus Service

बांगलादेश-भारत बससेवा कोरोना महामारीमुळं गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आली होती.

तब्बल दोन वर्षांनंतर भारत-बांगलादेश क्रॉस-बॉर्डर बससेवा पुन्हा सुरू

ढाका (बांगलादेश) : बांगलादेश आणि भारत (Bangladesh and India) ही क्रॉस-बॉर्डर बससेवा (Cross Border Bus Service) कोरोना महामारीमुळं (COVID-19 pandemic) गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आली होती. मात्र, आज (शुक्रवार) पुन्हा ती सुरू करण्यात आलीय. ICP आगरतळा-अखौरा आणि हरिदासपूर-बेनापोल मार्गे भारत-बांगलादेश बससेवा आज पहाटे ढाका येथून पुन्हा सुरु झालीय. ढाका-कोलकाता-ढाका असा या बसचा मार्ग असणार आहे, बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट करुन ही माहिती दिलीय.

बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे ( Bangladesh Road Transport Corporation, BRTC) अध्यक्ष ताझुल इस्लाम (Tazul Islam) यांनी गुरुवारी बससेवा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. 29 मे रोजी दोन्ही देशांमधील रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर ही सेवा सुरु करण्यात आलीय. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, मार्च 2020 पासून दोन्ही देशांतील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. या दोन्ही गाड्या भारत-बांगलादेश असा प्रवास करतात. बंधन एक्सप्रेस (Bandhan Express) कोलकाता आणि खुलना, बांगलादेश दरम्यान चालते, तर मैत्री एक्सप्रेस (Maitree Express) कोलकाता आणि ढाका मार्गे प्रवास करत असते.

हेही वाचा: विरोधी पक्षाचा 'बिगर काँग्रेसी' राष्ट्रपतीपदाचा उमेदवार असणार?

ढाका-सिल्हेट-शिलाँग-गुवाहाटी-ढाका मार्ग वगळता, इतर चार मार्गांवर आजपासून पुन्हा सेवा सुरू करण्यात आली असून पहिली बस मोतीझील येथून सकाळी 7:00 वाजता सुरू झालीय. यापूर्वी ढाका-कोलकाता-ढाका, ढाका-अगरतळा-ढाका, ढाका-सिलहेट-शिलाँग-गुवाहाटी-ढाका, आगरतळा-ढाका-कोलकाता-अगरतळा आणि ढाका-खुलना या पाच सीमापार मार्गांवर बसेस चालवण्यात आल्या आहेत. याबाबतचं वृत्त द डेली स्टारनं दिलंय. दरम्यान, पाचव्या मार्गावरही चर्चा सुरू असल्याचं बीआरटीसीच्या अधिकाऱ्यानं (BRTC) सांगितलंय.

Web Title: India Bangladesh Bus Service Resumes After Two Years Brtc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top