Wheat Export | केंद्राचा मोठा निर्णय! भारताकडून गव्हाची निर्यात तत्काळ बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia-Ukraine War Opportunities central government Strong Steps for Wheat Exports new delhi

केंद्राचा मोठा निर्णय! भारताकडून गव्हाची निर्यात तत्काळ बंद

भारत 2022-23 मध्ये 10 दशलक्ष टन धान्य निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं होतं. मोरोक्को, ट्युनिशिया आणि इंडोनेशियासह गव्हाच्या शिपमेंटला चालना देण्याचे प्रयत्न होणार असल्याचंही सांगण्यात आलं. (India Bans Wheat Export)

येणाऱ्या काळात गव्हाची जागतिक बाजारपेठ मिळवण्यासाठी व्यापारी शिष्टमंडळ पाठवणार असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं होतं. मात्र यानंतर मोठा निर्णय देत निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राने गुरुवारी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं होतं. मात्र यानंतर आता निर्णय फिरवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. (India Wheat Production)

भारत सरकारने इतर देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि संबंधित देशांच्या सरकारच्या विनंतीनुसार निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल, असं आता स्पष्ट करण्यात आलंय. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कृषी आणि प्रोसेस्ड फूड निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) यासंदर्भात माहिती दिली आहे. कॉमर्स, शिपिंग, रेल्वे आणि अन्य निर्यातदारांसह विविध मंत्रालयांच्या प्रतिनिधींनी गहू निर्यातीवर एक टास्क फोर्स स्थापन केली आहे.

हेही वाचा: रशिया युक्रेन युध्दातील संधी : गहू निर्यातीसाठी केंद्राची भक्कम पावले

भारताने 2021-22 मध्ये गव्हाची विक्रमी निर्यात केली. 7 दशलक्ष टन (MT) गहू निर्यात करून विक्रम केला. याचं मूल्य मूल्य $2.05 अब्ज आहे. मागील आर्थिक वर्षात एकूण शिपमेंटपैकी सुमारे 50% गहू बांगलादेशला निर्यात करण्यात आला आहे.

केंद्र सरकार मोरोक्को, ट्युनिशिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड, व्हिएतनाम, तुर्की, अल्जेरिया आणि लेबनॉन येथे भारतातून गहू निर्यात वाढवण्याच्या तयारीत आहे. यासाठी व्यापारी शिष्टमंडळ देखील पाठवणार असल्याचं स्पष्ट झालं. धान्याच्या वाढत्या जागतिक मागणीच्या पार्श्वभूमीवर भारताने २०२२-२३ मध्ये विक्रमी १० दशलक्ष टन गव्हाचे लक्ष्य ठेवल्याची माहिती मंत्रालयाने एका निवेदनात दिली होती.

पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये निर्यातीबाबत बैठका आयोजित करण्याचीही मंत्रालयाची योजना आहे.

आधी निर्यातीचं लक्ष्य...आता थेट निर्यात बंदी!

यंदा सरकारने १ कोटी टन विक्रमी गहू निर्यातीचे लक्ष्य समोर ठेवले आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार यासंदर्भात भारत मोठ्या प्रमाणावर गहू आयात करणाऱया ९ देशांत व्यापारी प्रतीनिधीमंडळे पाठविणार आहे. यात मोरोक्को, ट्यूनेशिया, इंडोनेशिया, फिलीपीन्स, थायलॅंड, व्हिएतनाम, तुर्कस्तान, अल्जेरिया व लेबनान या देशांचा सध्या समावेश आहे. भारत हा युक्रेन व रशिया पाठोपाठ जगातील सर्वांत मोठा गहू उत्पादक देश आहे. सध्याच्या युध्दामुळे अफ्रिका व काही आखाती देशांना दोन्ही देशांकडून आयात करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत कारण मालवाहू जहाजांचा मार्ग असलेला समुद्री मार्गच युध्दामुळे बंद झाला आहे. या स्थितीचा लाभ घेण्याचा भारताचा पुरेपूर प्रयत्न आहे.

Web Title: India Bans Wheat Exports With Immediate Effect

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Wheat
go to top