

Opposition leaders raise strong objections to delimitation while supporting women’s reservation in Parliament.
sakal
नवी दिल्ली : महिला आरक्षणासाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महिला आरक्षणाला विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविताना मतदारसंघ पुनर्रचनेला कडाडून विरोध केला आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आहे त्या स्वरूपात संमत झाले, तर देशात लोकशाही उरणार नाही, अशी तोफ विरोधकांनी डागली आहे.