
नवी दिल्ली : भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन रविवारी देशभर मोठ्या उत्साहात पार पडला. राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या दिमाखदार संचलनात भारताचे लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन झाले. सुरक्षा दलांच्या मिळून १८ पथके, ३१ चित्ररथ आणि पाच हजारांहून अधिक कलाकारांनी या संचलनात सहभाग घेतला होता.