India-China Border Tension : गलवान चकमकीनंतर चीनचा दोनदा हल्ल्याचा प्रयत्न; भारतीय जवानांनी दिलं चोख प्रत्युत्तर

जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीत झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यात अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र अजूनही दोन्ही देशात शांतता स्थापन होऊ शकली नाहीये.
India China Border
India China BorderSakal

India-China Border Tension : जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीत झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यात अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र अजूनही दोन्ही देशात शांतता स्थापन होऊ शकली नाहीये. इतेकच नाही तर वास्तविक नियंत्रण रेषेवर (लाइन ऑफ अॅक्चुअसल कंट्रोल-LAC) गलवान चकमकीनंतर पुन्हा दोन वेळा भारतीय आणि चीनी लष्करामध्ये चकमक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र या दोनही वेळा भारतीय लष्कराने चीनचे प्रयत्न हाणून पाडले.

गेल्या आठवड्यात लष्कराच्या वेस्टर्न कमांडने आयोजित केलेल्या एका समारंभात भारतीय लष्करातील जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात याबद्दलची माहिती समोर आली आहे . LAC वर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) सैनिकांच्या आक्रमकतेचा भारतीय सैन्याने कसा प्रतिकार केला हे यावेळी सांगण्यात आले.

चंडीमंदिर येथील लष्कराच्या मुख्यालयात झालेल्या या 13 जानेवारीच्या समारंभाचा व्हिडिओ वेस्टर्न कमांडने युट्यूब चॅनवर शेअर केला होता. ज्यात शौर्य पुरस्कारांबद्दल (Gallantry Award Citation) तपशीलवार माहिती देण्यात होती. मात्र, सोमवार, 15 जानेवारी रोजी व्हिडिओ हटवणयात आला.

India China Border
पोहरादेवीची नवस फेडायला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! भीषण अपघातात ६ जण ठार; चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावेळी नमूद करण्यात आलं होतं की, या चकमकी सप्टेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान घडल्या. दरम्यान लष्कराने या प्रकरणावर कुठलेही भाष्य केलेले नाहीये.

जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर, भारतीय लष्कराने 3,488 किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) चीनचा मुकाबला करण्यासाठी लष्करी तयारी ठेवली आहे.

मे 2020 मध्ये पूर्व लडाख सीमा वाद सुरू झाल्यापासून गेल्या साडेतीन वर्षांत, LAC वर भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये संघर्षाच्या अनेक घटना घडल्या आहेत. एलएसीच्या तवांग सेक्टरमध्येही चिनी सैन्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

India China Border
PM मोदींच्या गावात सापडली अडीच हजार वर्षांपूर्वीची मानवी वसाहत; समोर आला Video

9 डिसेंबर 2022 रोजी, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सैन्याने तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उलंघन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या चार दिवसानंतर संसदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दल खुलासा केला. भारतीय सैन्याने चिनी सैन्यांचा ठोस विरोध केल्याचे सिंह यांनी सांगितले.

वृत्तसंस्था पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या अतिक्रमणाच्या प्रयत्नाला जोरदार प्रत्युत्तर देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय लष्कराच्या अनेक जवानांना या सोहळ्यादरम्यान शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चीनी सैन्यासोबत समोरासमोर हाणामारी झाली ज्यामध्ये भारतीय सैन्याने धैर्याने पीएलएला भारताच्या हद्दीत घुसण्यापासून रोखले. तसेच त्यांना त्यांच्या पोस्टवर परत जाण्यास भाग पाडले, असेही राजनाथ सिंह यांनी 13 डिसेंबर रोजी सांगितले होते. तसेच या चकमकीत दोन्ही बाजूंचे काही जवान जखमी झाल्याचेही ते म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com