चीन, पाकिस्तान सावध व्हा! भारताचा 'प्रलय' येतोय; संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय

pralay tactical ballistic missiles
pralay tactical ballistic missilesesakal

नवी दिल्लीः चीन आणि पाकिस्तानने आता कुरापती थांबवून भारतापासून सावध राहिलं पाहिजे. कारण भारत सरकारने १२० प्रलय बॅलिस्टिक मिसाईच्या खरेदीला परवानगी दिलीय. हे क्षेपणास्त्र १५० ते ५०० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते.

संरक्षण मंत्रालयाच्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये सशस्त्र दलांसाठी सुमारे १२० क्षेपणास्त्रे खरेदी करुन चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्याचा मंजुरी मिळाली आहे. एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

विशेष म्हणजे या क्षेपणास्त्रांची रेंज आवश्यकतेनुसार वाढवता येणार आहे. २०१५मध्ये प्रलय क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी काम सुरु झाले होते. दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी या प्रोजेक्टवर भर दिला होता.

pralay tactical ballistic missiles
UAE Lottery : भारतीय ड्रायव्हरला यूएईमध्ये 33 कोटींची लॉटरी; वरिष्ठांनी दिला होता महत्त्वाचा सल्ला

मागच्या वर्षी २१ डिसेंबर आणि २२ डिसेंबरला सलद दोन वेळा या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली होती.

प्रलय हे अर्धखंडीय पृष्ठभागावरुन पृष्ठभागावर मारा करणारे मिसाईल आहे. सुरुवातीला हे क्षेपणास्त्र हवाई दलामध्ये सामील केलं जाईल, त्यानंतर भारतीय सैन्यदलामध्ये त्याचा सहभाग होईल.

संरक्षण मंत्रालयाच्या स्तरावर या मिसाईलला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच उत्पादन आणि वापराचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com