Constitution Day - संविधानाची मूल्ये जपायला हवीत; PM मोदींनी व्यक्त केली चिंता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदी

मन मोठं करून बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं त्याचं स्मरण न करणे हे चिंताजनक असल्याचं मोदी म्हणाले.

संविधानाची मूल्ये जपायला हवीत; PM मोदींनी व्यक्त केली चिंता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून भाषण केलं. तसंच २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/11 च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजलीसुद्धा वाहिली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, आपले संविधान हे देशाच्या हजारो वर्षांच्या भारताच्या महान परंपरेची अधुनिक अभिव्यक्ती आहे. संविधानाबद्दल समर्पण आहे. जेव्हा आपण या संविधानिक व्यवस्थेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी सांभाळतो त्यासाठी नेहमीच स्वत:ला सिद्ध ठेवावं लागेल. हे करताना संविधानाच्या मूल्यांना ठेच लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपण जे काही करतोय ते संविधानानुसार योग्य की चुकीचं हे बघायला हवं. आपल्याला स्वत:चं मूल्यांकन करायला हवं असंही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची सुरुवात झाल्यानंतर आपण २६ नोव्हेंबर हा संविधान दिनाची परंपरा सुरु करायला हवी होती. आपल्याला संविधान काय देतं, कुठे नेतं याची दरवर्षी चर्चा झाली तर संविधान ज्याला जगात एक सामाजिक दस्ताऐवज मानला गेला. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मोठी भेट दिली याची आपण दरवर्षी आठवण म्हणून हा दिन आता साजरा करतोय.

काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधावर मोदींनी निशाणा साधला. विरोध सुरुवातीपासूनच होतोय. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर आणि तुमच्या मनात तयार होत असलेला भाव ऐकण्यासाठी ते तयार नाही. मन मोठं करून बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं त्याचं स्मरण न करणे हे चिंताजनक असल्याचं मोदी म्हणाले.

भारत ही लोकशाहीची परंपरा आहे. राजकारणाचं एक महत्त्व आहे. राजकीय पक्ष त्यांचे लोकशाही मूल्य गमावत असतील तर ते लोकशाही कसे जपू शकतात असा सवालसुद्धा मोदींनी विचारला. भ्रष्टाचारावरूनही मोदींनी काँग्रेसवर टीका केली. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा मिळवून देण्याची जी स्पर्धा चालली आहे त्यामुळे नव्याने येणाऱ्या लोकांना चुकीचा आदर्श घालून दिला जातोय असंही मोदी म्हणाले.

इंग्रज भारताचे अधिकार नाकारत होते. महात्मा गांधींनी अधिकारांसाठी लढताना देशात कर्तव्यासाठी नागरिकांना तयार केलं होतं. त्यासाठी सातत्याने प्रयत्न केलं. मात्र स्वातंंत्र्यानंतर महात्मा गांधींनी कर्त्यव्याची बीजे रोवली त्यादिशेने दुर्दैवाने तत्कालीन सरकारने काम केलं नाही. तेव्हाच्या सरकारने अधिकार अधिकार असं म्हणत सगळं हातात घेतलं. स्वातंत्र्यानंतर कर्तव्यावर भर दिला असता तर अधिकारांचे संरक्षण झालं असतं असं म्हणत पुन्हा एकदा मोदींनी अप्रत्यक्षपणे नेहरुंवर आणि काँग्रेसवर टीका केली.

loading image
go to top