esakal | कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 50 लाख मृत्यू?
sakal

बोलून बातमी शोधा

corona death toll

भारतीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक मृत्यू विषाणूमुळे झाले आहेत. पण, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये हे आकडे चुकीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 50 लाख मृत्यू?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जगावरील कोरोना महामारीचं संकट अजून टळलेलं नाही. अनेक देश या संकटाशी सामना करत आहेत. भारताने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना केला आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक मृत्यू विषाणूमुळे झाले आहेत. पण, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये हे आकडे चुकीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतात 10 पटीने अधिक मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. रिपोर्टमधील दाव्यानुसार, भारतात कोरोना महामारीमुळे 34 ते 47 लाख लोकांना मृत्यू झाला आहे. जो की केंद्र सरकारने सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा 10 पटीने अधिक आहे. (india corona death more than predicted america report)

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतामध्ये आतापर्यंत 4.14 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. मृतांच्या संख्येत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा तिसरा क्रमांक आहे. अमेरिकेमध्ये 6,09,000 आणि ब्राझीलमध्ये 5,42,000 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकी स्टडी ग्रुप सेंटर ऑफ ग्लोबल डेव्हलपमेंटच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलेला मृतांच्या आकडेवारीचा दावा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. आतापर्यंत कोणत्याही रिपोर्टने इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचा दावा केला नव्हता.

हेही वाचा: चिंता वाढली! 'बर्ड फ्लू'मुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद

अभ्यासकांच्या मते मृतांचा आकडा लाखांमध्ये आहे. आकड्याकडे पाहिल्यास भारताला स्वातंत्र्य आणि फाळणीवेळी झालेल्या हानीपेक्षा हे सर्वात मोठे संकट आहेत. सेंटरने आपला अभ्यास कोरोनाच्या दरम्यान झालेले मृत्यू आणि त्याआधीच्या वर्षात झालेल्या मृतांच्या आकड्यांचे विश्लेषण केले आहे. याच्या आधारे सेंटरने 2020 ते 2021 पर्यंत झालेल्या मृतांच्या संख्येचा आकडा पुढे आणला आहे. रिपोर्टने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा: ...तर देशातील वीज कामगार संपाचे हत्यार उपसणार!

सेंटर ऑफ ग्लोबल डेव्हलपमेंटकडून मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमधील आकडे सरकारी आकडेवारी, आंतरराष्ट्रीय अंदाज, सिरोलॉजिकल रिपोर्ट आणि घरांमध्ये झालेल्या सर्व्हेच्या आधारे जाहीर करण्यात आले आहेत. या रिपोर्टमधील विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे याच्या अभ्यासकांमध्ये मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले अरविंद सुब्रमण्यन यांचाही समावेश आहे. अभ्यासकांचा दावा आहे की सरकारने सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा मृतांची संख्या खूप अधिक आहे.

loading image