Corona Update - देशात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत वाढ; केरळने वाढवली चिंता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ९१८ इतकी आहे.

देशात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत वाढ; केरळने वाढवली चिंता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात भारतात ११ हजार २७१ नवे रुग्ण आढळले असून २८५ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिलासा देणारी बाब म्हणजे सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ९१८ इतकी आहे. देशातील नव्या रुग्णसंख्येत एकट्या केरळमधील ६ हजार ४६८ रुग्ण आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४४ लाख ३७ हजार ३०७ इथकी झाली आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून १ लाख ३५ हजार ९१८ इतकी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ६३ हजार ५३० झाली आहे. आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ३७ हजार ५८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनावर देशव्यापी लसीकरण मोहिम सुरु आहे. आतापर्यंत ११२ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. ५७ लाख ४३ हजार ८४० जणांना शनिवारी लस देण्यात आली आहे. एकूण ११२ कोटी १ लाख ३ हजार २२५ डोस देण्यात आले आहेत.

देशात केरळने चिंता वाढवली आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात ६ हजार ४६८ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० लाख ५५ हजार २२४ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३५ हजार ६८५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ६८ हजार ६३० जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

loading image
go to top