esakal | Corona Update: देशात गेल्या 24 तासांत 44 हजार 459 कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Corona Update: देशात गेल्या 24 तासांत 44 हजार 459 कोरोनामुक्त

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली india corona update- देशात कोरोना आकडेवारी जवळपास स्थिर आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 43 हजार 393 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 44 हजार 459 रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. गुरुवारी 911 लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 58 हजार 727 झाली आहे. आतापर्यंत 2 कोटी 98 लाख 88 हजार 284 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (india corona update today covid19 health ministry active cases)

गुरुवारपेक्षा शुक्रवारी 2 हजार 499 कोरोना रुग्ण कमी नोंदले गेले आहेत. गुरुवारी 45 हजार 892 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. असे असले तरी मृतांमध्ये 94 ने वाढ झाली आहे. आतापर्यंत 42 कोटी 70 लाख 16 हजार 605 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. गुरुवारी 17 लाख 90 हजार 708 रुग्णांची चाचणी करण्यात आली. आयसीएमआरने यासंदर्भातील माहिती दिली.

कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. कोरोना विषाणूला हरवायचं असेल तर लसीकरण हाच प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. आतापर्यंत 36 कोटी 48 लाख 47 हजार 549 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यातील 29 कोटी 58 लाख 89 हजार 870 लोकांना पहिला डोस मिळाला आहे, तर 6 कोटी 89 लाख 57 हजार 679 लोकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. गेल्या 24 तासांत 33 लाख 8 हजार लोकांना लस देण्यात आली.

loading image