esakal | Corona Update: 111 दिवसानंतर देशात सर्वात कमी नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 34 हजार 703 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा आकडा 111 दिवसातील सर्वात कमी आहे.

Corona Update: 111 दिवसानंतर देशात सर्वात कमी नवे रुग्ण

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 34 हजार 703 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा आकडा 111 दिवसातील सर्वात कमी आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, 101 दिवसानंतर भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या सर्वात खालच्या स्तराला गेली आहे. देशात सध्या 4 लाख 64 हजार 357 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. देशात सध्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 1.52 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. (india Corona Update today health ministry covid19 delta)

गेल्या 24 तासांत 51 हजार 864 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सलग 54 दिवसांपासून ही संख्या जास्त नोंदवली जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचा दर 97.17 टक्के झाला आहे. पॉझिटिव्ही रेटही पाच टक्क्यांपेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे देशातील कोरोना आकडेवारी स्थिरतेकडे जात असल्याचं चित्र आहे.

देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी पर्याय असल्याचं तज्त्रांचं मत आहे. आतापर्यंत देशातील 35 कोटी 75 लाख लोकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस घेतला आहे. देशात लसीकरणाच्या मोहिमेला गती आली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी

राज्यात सोमवारी 6,740 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. नवीन 13,027 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,61,720 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,16,827 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.02% झाले आहे.

loading image