corona update: कोरोना रुग्णांचा आलेख उतरता; जाणून घ्या आजची आकडेवारी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 24 January 2021

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजारांपेक्षा कमी आहे. देशात मागील 24 तासात 14,849 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 15,948 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 24 तासात 155 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. 

नवे 14,849 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,06,54,533 झाली आहे. सध्या देशात कोरोनाचे 1,84,408 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात 1,03,16,786 लोकांना कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 1,53,339 लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. 

देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 23 जानेवारीपर्यंत देशात 15,82,201 लोकांना लस देण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस दिली जात आहे. देशात एकूण 3 कोटी आरोग्य कर्मचारी असल्याचं सांगितलं जातंय. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india corona virus update toady vaccination