देशात कोरोना रुग्णसंख्येत 40 टक्क्यांची वाढ; 24 तासांत 7240 नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus Patient Updated
Coronavirus Patient Updatedesakal
Summary

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं चिंता व्यक्त केली जात आहे.

Coronavirus Cases : देशात कोरोनाच्या (COVID19) वाढत्या रुग्णसंख्येमुळं चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांत 7240 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. त्यानंतर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 32 हजार 490 वर पोहोचलीय. देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव वेगानं होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 40 टक्क्यांनी वाढत आहे. (Coronavirus Patient Updated)

आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशात 7240 नवीन रुग्ण आढळले असून, सक्रिय रुग्णांची संख्या 32 हजार 490 झालीय. त्यापैकी 2,701 रुग्ण केवळ महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. ही गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्येतही 42 टक्क्यांनी वाढ झालीय. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत.

Coronavirus Patient Updated
देशात मोठ्या आत्मघाती हल्ल्याची शक्यता; 'अल कायदा'ची भारताला थेट धमकी

राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला 800 - 900 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. तर, देशात गेल्या तीन महिन्यांनी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (COVID19) संख्येनं 5 हजारांचा टप्पा ओलांडलाय. बुधवारी दिवसभरात 5 हजार 233 कोरोनाबाधितांची भर पडली होती. विशेष म्हणजे, गेल्या एका दिवसात दैनंदिन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तब्बल 40 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.

Coronavirus Patient Updated
कोरोनानंतर आता 'मंकीपॉक्स'चा धोका वाढला; WHO कडून मोठा इशारा

मंगळवारी दिवसभरात 3 हजार 714 कोरोनाबाधित आढळले होते. गेल्या एका दिवसात 3 हजार 345 रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली, तर 7 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. देशात आतापर्यंत 194 कोटी 59 लाख 81 हजार 691 कोरोना डोस देण्यात आले आहेत. यातील 3.46 कोटी डोस 12 ते 14 वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून 3.72 कोटी बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com