
मुंबई : भारत एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयाला येत आहे आणि जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जात आहे , असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. देशाच्या इतिहासात प्रथमच तीन युद्धनौका एकत्र कार्यान्वित होत आहेत. ही घटना ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत संरक्षण उत्पादन, सागरी सुरक्षा आणि आर्थिक विकासात देशाची प्रगती अधोरेखित करणारी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.