Indian Evacuation from Iran : इराणमधील संकटात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमाने सज्ज; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

Indian Ministry of External Affairs on Iran Crisis: जाणून घ्या, परराष्ट्र मंत्रालयाने इराणमधील भारतीयांना नेमकं काय आवाहन केलं आहे?
Evacuation aircrafts prepared by the Indian government to bring back Indian citizens stranded amid the ongoing Iran crisis.

Evacuation aircrafts prepared by the Indian government to bring back Indian citizens stranded amid the ongoing Iran crisis.

esakal

Updated on

India prepares evacuation flights as the Iran crisis escalates : इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विमाने सज्ज आहेत. इराणमधील चिघळत चालेली परिस्थिती आणि वाढत्या तणावामुळे, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने  मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना, सुरक्षित परत आणण्याची सुविधा देण्यासाठी पूर्ण वचनबद्धता दर्शवली आहे. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि आवश्यकता असल्यास विशेष उड्डाणे किंवा इतर व्यवस्था केली जाईल.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देते. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि आवश्यक पावले उचलण्यास तयार आहोत."

खरंतर इराणमध्ये देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे  आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त होत असताना, हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच इराणने नुकतेच आपले हवाई क्षेत्रही काही तासांसाठी बंद केले होते, ज्यामुळे दिल्लीहून न्यू यॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या परतीच्या प्रवासासह अनेक उड्डाणे विस्कळीत झाली होती.

Evacuation aircrafts prepared by the Indian government to bring back Indian citizens stranded amid the ongoing Iran crisis.
municipal elections exit poll 2026 : मुंबईत भाजप-शिवसेना महायुतीच भारी; ठाकरेंचा गड ढासळणार अन् काँग्रेस आघाडीलाही फटका

परराष्ट्र मंत्रालयाने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना त्यांचे सर्व आवश्यक कागदपत्रे, जसे की पासपोर्ट, व्हिसा, ओळखपत्र पुरावा आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितले आहे. त्यांना इराणमधील भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांना त्वरित कळविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Evacuation aircrafts prepared by the Indian government to bring back Indian citizens stranded amid the ongoing Iran crisis.
Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

याशिवाय इराणमध्ये भारतीय नागरिकांच्या संख्येबाबत अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. परंतु असा अंदाज आहे की हजारो भारतीय विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि इतर कारणांमुळे भारतीय नागरिक तेथे उपस्थित आहेत.

Evacuation aircrafts prepared by the Indian government to bring back Indian citizens stranded amid the ongoing Iran crisis.
IPAC Raid Case Update : ममता बॅनर्जींना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका! 'ED' अधिकाऱ्यांविरोधातील ‘FIR’ला स्थगिती

याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना इराणमधील भारतीय दूतावासाची वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडल नियमितपणे अपडेट्ससाठी तपासण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अनावश्यक प्रवास टाळा आणि कोणत्याही असामान्य परिस्थितीत तात्काळ दूतावासाशी संपर्क साधा, असेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com