Cervical Cancer Vaccine: सिरमची पहिली स्वदेशी 'सर्व्हिकल कॅन्सर' प्रतिबंधक लस लवकरच बाजारात; खूपच कमी असेल किंमत

भारतात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण मोठं प्रमाण आहे. दरवर्षी हजारो महिलांचा यामुळं मृत्यू होतो.
Cervical cancer
Cervical cancersakal

नवी दिल्ली : गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी प्रतिबंधक लस याच महिन्यात बाजारात दाखल होत आहे. त्यामुळं महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी सुत्रांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. त्याचबरोबर या लसीची किंमत खूपच कमी असणार आहे, याचा खुलासाही करण्यात आला आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बाजारात आणणार आहे. (Indias first indigenous cervical cancer vaccine to hit market soon will available at a very low price)

स्वदेशी लस २००० रुपयात उपलब्ध असणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ही पहिली स्वदेशी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) लस २४ जानेवारी रोजी लॉन्च झाली होती. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला आणि सिरमचे सरकार आणि नियामक व्यवहार संचालक प्रकाश कुमार सिंह त्यावेळी उपस्थित होते. सरकारच्या सुत्रांनुसार, सिंह यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहलं असून स्वदेशी दोन डोसच्या HPV लसीची किंमत जी बाजारात २,००० रुपये प्रति व्हॉयल आहे. ती सध्याच्या उपलब्ध HPV लशींपेक्षा बरीच कमी असल्याचं म्हटलं आहे.

हॉस्पिटल्स, डॉक्टर्स आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी लस याच महिन्यात बाजारात आणण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्याचबरोबर सिंह यांनी आपल्या पत्रात असंही म्हटलं की, सिरम आपली HPV लस खूपच परवडेल अशा दरात उपलब्ध करुन देईल. जी लस आरोग्य मंत्रालयाकडून खरेदी करण्यात येईल. सध्या देश पूर्णतः विदेश HPV लसवर अवलंबून आहे.

सध्याची लशीची किंमत १०,००० रुपये

सध्याच्या घडीला बाजारात केवळ एकच HPV लस उपलब्ध आहे. जी अमरेकन मल्टिनॅशनल मर्क्स गार्डशील कंपनीनं बनवलेली आहे. ही सिंगल डोस सिरिंजमध्ये भरलेल्या लशीची किंमत १०,८५० रुपये इतकी आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्व्हिकल कॅन्सरवरील HPV लशीचा समावेश राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत करण्यात येणार आहे. जनू २०२३ पासून ९ ते १४ वयोगटातील मुलींना ही लस दिली जाणार आहे. तसेच यासंदर्भात एप्रिल महिन्यात ग्लोबल टेंडरी काढण्यात येणार आहे.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची भारतात मोठी संख्या

भारतामध्ये जगातील 16 टक्के स्त्रिया आहेत. परंतू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या सर्व घटनांपैकी एक चतुर्थांश आणि जागतिक गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळजवळ एक तृतीयांश महिला भारतात आहेत. भारतीय महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका 1.6 टक्के आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे 1 टक्के मृत्यूचा धोका आहे. अलीकडील अंदाजानुसार, भारतात दरवर्षी जवळपास 80,000 महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आणि 35,000 महिलांचा मृत्यू होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com