काळ्या पैशाविरोधातील लढ्याला मोठे यश; स्विस बँकेतील तपशील मिळाला 

काळ्या पैशाविरोधातील लढ्याला मोठे यश; स्विस बँकेतील तपशील मिळाला 

नवी दिल्ली : भारत सरकारने काळ्या पैशाविरोधात उघडलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्विस बॅंकांमध्ये असलेल्या भारतीयांच्या खात्यांचा तपशील असलेली पहिली यादी भारताला सोपविण्यात आल्याची माहिती स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्‍स ऍडमिनिस्ट्रेशनच्या (एफडीए) प्रवक्‍त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. 

माहिती आदान-प्रदानासंदर्भातील नव्या व्यवस्थेअंतर्गत 75 देशांना स्विस बॅंकेतील खातेदारांचा तपशील देण्यात आला असून, यात भारताचाही समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील माहिती 2020 मध्ये दिली जाणार असल्याचेही प्रवक्‍त्याने या वेळी स्पष्ट केले. "एईओआय' नियमावलीअंतर्गत भारताला स्वित्झर्लंडकडून प्रथमच काळ्या पैशाबाबतची माहिती मिळाली आहे. 

स्विस बॅंकांमध्ये सध्या चालू असलेली व 2018 दरम्यान बंद करण्यात आलेल्या खात्यांची माहिती "एफटीए'ने भारताला दिली आहे. या खात्यांची संख्या नेमकी किती आहे आणि त्याच्याशी संबंधित मालमत्तेचा तपशील देण्यास मात्र "एफटीए'च्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. 

माहितीमध्ये याचा समावेश 
माहिती आदान-प्रदान व्यवस्थेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये स्विस बॅंकेत खाते असलेल्यांचे नाव, पत्ता, तो राहत असलेला देश, करनोंदणी क्रमांक, वित्तीय संस्थेशी संबंधित माहिती, खात्यावरील शिल्लक तसेच भांडवली उत्पन्न, यांचा समावेश असतो. 

आता पुढे काय? 
स्वित्झर्लंड सरकारकडून मिळालेल्या माहितीनंतर पुढे काय कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही सर्व खाती बेकायदा नसून, सरकारी तपास यंत्रणा याप्रकरणी विस्तृत तपास सुरू करतील. यामध्ये खातेधारकांचे नाव, त्यांच्या खात्यांची माहिती एकत्रित करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

"एफटीए'कडून माहितीचे आदान-प्रदान 
- 31 लाख 
खात्यांची माहिती प्रदान 
---- 
24 लाख 
खात्यांची माहिती प्राप्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com