संरक्षणावर भारताचे वाढते ‘बळ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Defense Forces
संरक्षणावर भारताचे वाढते ‘बळ’

संरक्षणावर भारताचे वाढते ‘बळ’

स्टॉकहोम: जगाचा संरक्षणावरील खर्चात २०२१ मध्ये २.१ ट्रिलियन डॉलर एवढी वाढ झाली. आतापर्यंतचा हा सर्वाधिक खर्च होता. ही माहिती ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने (एसआयपीआरआय)ने सोमवारी दिली. जगात तीन देशांनी संरक्षणावर सर्वांत जास्त खर्च केला, अशी नोंद या संस्थेने केली असून यात अमेरिका, चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताचे नाव आहे.

‘एसआयपीआरआय’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे, की २०२१ मध्ये एकूण जागतिक संरक्षण खर्चात ०.७ टक्के एवढी वाढ झाली आहे. तो दोन हजार ११३ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. गेल्या वर्षात सर्वात जास्त खर्च करणारे पहिले पाच देश म्हणजे अमेरिका, चीन, भारत, ब्रिटन आणि रशिया हे आहेत. या देशांचा एकत्रित खर्च हा ६२ टक्के आहे. कोरोनाकाळात सुस्तावलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होत असताना संरक्षण खर्च जागतिक पातळीवरील देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) २.२ टक्के नोंदविला आहे. २०२०मध्ये हा आकडा २.३ टक्के होता.

अमेरिका

२०२१मध्ये संरक्षण खर्च

८०१ अब्ज डॉलरवर पोहोचला

२०२० पेक्षा १.४ टक्क्यांनी घट

२०१२ ते २०२१ या काळात अमेरिकेने सैनिकी संशोधन आणि विकासावरील निधीत

२४ टक्के वाढ

शस्त्र खरेदीवरील खर्चात

६.४ टक्क्याने कपात

अन्य देशांची स्थिती

ब्रिटनचे गेल्या वर्षी संरक्षणावर ६८.४ अब्ज डॉलर खर्च

२०२० च्या तुलनेत त्यात तीन टक्के वाढ झाली

रशियाचे २०२१मध्ये संरक्षणावर ६५.९ अब्ज डॉलर खर्च

युक्रेन सीमेवर सैन्य तैनातीच्या काळात ही वाढ

२.९ टक्के झाली

‘जीडीपी’च्‍या ४.१ टक्के वाढ होण्याचे हे रशियाचे

सलग तिसरे वर्ष आहे

भारत

गेल्या वर्षी ७६.६ अब्ज

डॉलर खर्च

२०२०पेक्षा खर्चात ०.९ टक्के वाढ

२०१२पासून संरक्षणावरील खर्च ३३ टक्क्याने वाढला

स्वदेशी शस्त्रास्त्र उद्योगाला बळकटी देण्याच्या प्रयत्नात २०२१ च्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी ६४ टक्के निधी राखीव

कोरोनाच्या साथीमुळे आर्थिक संकट निर्माण झाले होते तरी जगाचा सैन्यावरील खर्च विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. वास्तविकरित्या चलनवाढीमुळे हा वेग मंदावला असला तरी संरक्षणावरील खर्चात ६.१ टक्का वाढ झाली आहे.

-डॉ. दिएगो लोपेस द सिल्व्हा, वरिष्ठ संशोधक, एसआयपीआरआय

Web Title: India Growing Strength Defense Us China Spending

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top