राम जेठमलानी निर्भिड होते : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
Sunday, 8 September 2019

आणीबाणीच्या काळात त्यांनी सार्वजनिक स्वातंत्र्यासाठी लढलेली लढाई कायम स्मरणात राहील. गरजूंना मदत करण्याची त्यांना आवड होती. मी स्वतःला भाग्यवान समजतो, की अनेकवेळा त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. या कठीण काळात मी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे.

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्यात सर्वांत चांगली गोष्ट होती, ती म्हणजे मनात कोणतीही भिती न ठेवता ते त्यांच्या मनातील गोष्ट स्पष्ट बोलू शकत होते. ते निर्भिड व्यक्ती होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

ज्येष्ठ वकील, कायदेतज्ज्ञ व माजी केंद्रीय कायदामंत्री राम जेठमलानी (वय 95) यांचे आज (रविवार) सकाळी दीर्घ आजारपणाने निधन झाले. जेठमलानी यांच्या कुटुंबीयांनी आज सकाळी त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारपणाशी लढत होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती खूप खालावली होती.

मोदी म्हणाले, की आणीबाणीच्या काळात त्यांनी सार्वजनिक स्वातंत्र्यासाठी लढलेली लढाई कायम स्मरणात राहील. गरजूंना मदत करण्याची त्यांना आवड होती. मी स्वतःला भाग्यवान समजतो, की अनेकवेळा त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. या कठीण काळात मी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India has lost an exceptional lawyer and iconic public figure says PM Narendra Modi