स्वत: संकटात असूनही भारताने निभावला शेजार धर्म; 6 देशांना पाठवतोय कोरोना लस

bhutan
bhutan

नवी दिल्ली- कोरोनाचं संकट असतानाही भारत शेजार धर्माचे पालन करण्यासाठी पुढे आला आला आहे. बुधवारपासून भारत सरकार भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार या देशांना कोरोना लशींचा पुरवठा करणार आहे. भारताकडून गिफ्ट म्हणून सर्वात आधी भूतानला लस दिली गेली. बुधवारी सकाळी कोविशिल्ड लशीचे 1.5 लाख डोस भूतानला पाठवण्यात आलेत. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन बुधवारी सकाळी भूतानची राजधानी थिम्पूसाठी रवाना झाली. कोणत्याही क्षणी लशीची खेप भूतानला पोहोचू शकते. 

Corona Update : गेल्या 24 तासांत भारतात 13,823 नवे रुग्ण; काल राज्यात 50...

कोरोना महामारीचा भारतात प्रकोप झाला. आता कुठे देशात लसीकरणाला सुरुवात झाली असून आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. येत्या काळात लशीचा तुटवडा जाणवण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी भारताने 'वसुधेव कुटुंबकम'ची परंपरा कायम ठेवली आहे. विश्वाच्या कल्याणासाठी भारत पुढे आला आहे. शेजार धर्माचे पालन करत भारताने आपल्या मित्र राष्ट्रांना लशींचा पुरवढा सुरु केला आहे. वृत्तसंस्था एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.  

भारताकडून लशींची मदत मिळवणारा भूतान पहिला देश ठरला आहे. अन्य देशांनाही लशींची उपलब्धता करुन दिली जाणार आहे. यात मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार या देशांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस या देशांच्या नियामक मंडळाच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. त्यानंतर या देशानांही लशीचा पुरवठा केला जाईल. भूतानसोबत असलेल्या खास संबंधांमुळे त्या देशाला सर्वातआधी मदत केली जात आहे. भारताने कोरोना महामारीच्या काळातही भूतानला मदत केली आहे. 

विवाहबाह्य संबंध लिव्ह-इन-रिलेशनशिप ठरु शकत नाही, तो गुन्हाच- हायकोर्ट

दरम्यान, भारतात जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेस सुरवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांत 3.8 लाख लोकांना कोरोनाची लस दिली गेली आहे. लसीकरणानंतर 580 जणांना त्याचे साईड इफेक्ट्स जाणवल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी सात लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. तर दोन लोकांचा मृत्यू झाला आहे, मात्र या मृत्यूंचा लसीकरणाशी काहीही संबंध नसल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com