
India is role model : जगातील अनेक देशांसाठी भारत 'रोल मॉडेल'; जर्मनीकडून कौतुक
नवी दिल्ली : जगातील अनेक देशांसाठी भारत हा रोल मॉडेल आहे. त्याचबरोबर अनेक देशांमध्ये सेतू म्हणूनही भारत काम करत आहे, अशा शब्दांत जर्मनीनं भारताचं कौतुक केलं आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत भेटीवर आलेल्या जर्मनीचे परराष्ट्रमंत्री अॅनालेना बेअबॉक यांनी हे विधान केलं आहे. (India is role model for many countries globally says German foreign minister)
बेरबॉक हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. भारतात ते अक्षय ऊर्जेच्या विविध प्रकल्पांना भेटी देणार आहेत. याचा ग्रामीण भागावर कसा परिणाम झाला आहे याची माहिती देखील ते घेणार आहेत.
बेरबॉक हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. भारतात ते अक्षय ऊर्जेच्या विविध प्रकल्पांना भेटी देणार आहेत. याचा ग्रामीण भागावर कसा परिणाम झाला आहे याची माहिती देखील ते घेणार आहेत. याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, गांधी स्मृतीला भेट देत आजपासून माझा भारत दौरा सुरु होत आहे. भारताच्या उच्च ऐतिहासिक वारशानं मला नेहमीच प्रभावित केलं आहे. आज मी गांधीजींबद्दल जाणून घेतल्यानतंर भारताला स्वातंत्र मिळवणं खरचं इतक सोप्प नव्हतं हे कळालं आहे.
हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
महात्मा गांधीच्या हत्येला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. पण भारताच्या लोकशाही आणि आमच्या लोकशाहीचे खूपच जवळच बंध आहेत. मुल्यांची जोपासणा, मानव हक्क, स्वातंत्र, लोकशाही आणि कायद्यावरचा विश्वास या गोष्टींवर हे बंध आधारित आहेत, असंही बेअबॉक यांनी म्हटलं आहे.