esakal | India: काश्‍मीरमध्ये व्यापक मोहीम : चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार
sakal

बोलून बातमी शोधा

चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार
काश्‍मीरमध्ये व्यापक मोहीम : चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार

काश्‍मीरमध्ये व्यापक मोहीम : चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जम्मू : जम्मू-काश्‍मीरमध्ये सोमवारी (ता. ११) दिवसभरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पाच चकमकी झडल्या. यातील पूँच जिल्ह्यातील एका चकमकीत नायब सुभेदारासह लष्कराचे पाच जवान हुतात्मा झाल्याने सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पूँच व राजौरी जिल्ह्यात मंगळवारी व्यापक शोध मोहीम राबविली. आज शोपियाँ जिल्ह्यातील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

पूँचमधील सुरणकोट व राजौरीतील थानामंडी जवळील जंगलात शोध घेत असताना सुरक्षा पथक व दहशतवाद्यांमध्ये कोणताही संघर्ष झाला नाही. काल सुरुवातीच्या चकमकीनंतर दहशतवादी थानामंडीतील पानघई जंगलात पळाले. यानंतर चकमक थांबली. या संपूर्ण भागाला सुरक्षा पथकाने वेढा घातला असून दहशतवाद्यांचे अड्डे उद्‍ध्वस्त करण्यासाठी मंगळवारी शोध मोहिमेला वेग देण्यात आला.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पूँच व राजौरी जिल्ह्यांच्या सीमांवर रविवारी (ता.१०) व सोमवारी (ता.११) दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्याने भारतीय लष्कर व जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी सहदरा भागात दहशतवाद विरोधी मोहीम सुरू केली, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. या दोन जिल्ह्यांत यंदा जूनपासून घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या विविध चकमकींमध्ये नऊ दहशतवाद्यांना ठार केले आहे.

loading image
go to top