देशात कोरोना प्रादुर्भावात पुन्हा वाढ; गेल्या 24 तासांत ६० जणांचा मृत्यू, तर...| India logs 21,880 new Covid-19 cases, 60 deaths in last 24 hours | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19 News

देशात कोरोना प्रादुर्भावात पुन्हा वाढ; गेल्या 24 तासांत ६० जणांचा मृत्यू, तर...

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या २१ हजार ८८० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर गंभीर बाब म्हणजे ६० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढून 4.25 टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या देशात १ लाख ४९ हजार ४८२ सक्रिय रुग्ण आहेत.(India logs 21,880 new Covid-19 cases, 60 deaths in last 24 hours)

आरोग्य मंत्रलयाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत ५२५९३० जणांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तर ४३१७१६५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सर्वाधिक प्रकरणे नोंदवणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये केरळमध्ये 2,662 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 2,486 रुग्ण, महाराष्ट्रात 2,289 नवे रुग्ण, तामिळनाडूमध्ये 2,093 आणि कर्नाटकात 1,552 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या पाच राज्यांपैकी केरळमध्ये 12.17 टक्के नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

भारताने गेल्या 24 तासात एकूण ३७,०६,९९७ डोस देण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रशासित डोसची एकूण संख्या २,०१,३०,९७,८१९ झाली.

गुरुवारी महाराष्ट्रात 2289 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासांत एकूण 2400 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. गुरुवारी सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,64,831 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे.