

सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे की, भारतात कोरोना महामारी ही Endemic Stage म्हणजेच स्थानिक टप्प्यात पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी यातून लवकर सुटका होणार नसल्याचे संकेत जागितक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी दिले आहेत. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे की, भारतात कोरोना महामारी ही Endemic Stage म्हणजेच स्थानिक टप्प्यात पोहोचण्याच्या मार्गावर आहे. या टप्प्यात कमी आणि सौम्य स्तरावर संसर्ग होतो.
डॉक्टर सौम्या यांनी म्हटलं की, जेव्हा लोक कोणत्याही विषाणूसह रहायला शिकतात तेव्हा स्थानिक स्थिती (Endemic Stage) होते. आशा आहे की, जागितक आरोग्य संघटना भारतातील कोव्हॅक्सिनला त्यांच्या अधिकृत लशींमध्ये समाविष्ट करण्यासाठीची मंजुरी देण्यावर सहमत होईल. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळू शकेल असंही त्यांनी सांगितलं.
भारताची भौगोलिक विविधता, वेगवेगळ्या भागातील लोकसंख्या आणि लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारक क्षमता पाहता असं म्हणता येईल की, भारतात कोरोना बराच काळ राहील. येत्या काही वर्षांमध्ये कोरोनाच्या परिस्थितीत चढ उतार बघायला मिळतील असंही सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं.
भारतातील सध्याची परिस्थिती पाहता आपण म्हणू शकतो की इथे कोरोना संसर्ग स्थानिक टप्प्यात पोहोचला आहे. भारतात आता कमी आणि सौम्य स्तरावर संसर्ग होत आहे. कोरोना संसर्गाचा वेग हा आधीच्या तुलनेत स्थिर आहे. तसंच बराच काळ यामध्ये वाढ झालेली नाही. भारतातील लोकसंख्या आणि प्रतिकार क्षमतेची परिस्थिती पाहता असा अंदाज आहे की पुढेही कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार बघायला मिळेल असं सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या.
देशातील परिस्थिती सामान्य कधी होणार यावरही सौम्या स्वामिनाथन यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 2022 अखेरपर्यंत सर्व काही सुरळीत होईल अशी आशा आहे. आपण इतक्या लोकांना सध्या लस दिलीय की अशी आशा व्यक्त करू शकतो. 70 टक्के लसीकरण झाल्यानंतर देशातील परिस्थिती सामान्य होईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच तिसऱ्या लाटेचा अंदाज लावणं कठीण असल्याचंही सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.