esakal | संरक्षणमंत्री म्हणाले; दोन्ही देशांतील 'रोटी-बेटी'चं नातं कोणीही तोडू शकणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

 Rajnath Singh, India, Nepal

भारत-नेपाळमध्ये तणावाचे वातावरण असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल असं म्हटलं आहे.

संरक्षणमंत्री म्हणाले; दोन्ही देशांतील 'रोटी-बेटी'चं नातं कोणीही तोडू शकणार नाही

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली- दोन दिवसांपूर्वी नेपाळच्या कायदेमंडळाने संविधानात दुरुस्ती करुन देशाच्या नव्या नकाशाला मान्यता दिली आहे. या नकाशात नेपाळने लिपूलेख, कालापाणी, लिम्पियाधुरा हे भारतीय प्रदेश आपले असल्याचे दाखवले आहे. या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळमध्ये तणावाचे वातावरण असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल असं म्हटलं आहे. ते उत्तराखंडमध्ये बोलत होते. भारताने लिपूलेखपर्यंत बनवलेला रस्ता हा भारतीय हद्दीतच आहे. हा रस्ता कैलाश-मानसरोवर यात्रेच्या मार्गावर आहे. मात्र, तरीही  या रस्ता बांधणीमुळे कुणाची गैरसमजूत झाली असेल तर चर्चेच्या माध्यमातून यातून मार्ग काढला जाईल. भारत आणि नेपाळ 'रोटी आणि बेटी'ने जोडले गेले आहेत. त्यामुळे हे बंधन तोडण्याची ताकद जगात कोणाच्यातही नाही, असं सिंह म्हणाले आहेत. 

चीन पाठोपाठ नेपाळचे फुत्कार, भारताची जमीन दाखवली आपल्या नकाशावर

लष्कर प्रमुख म. नरवणे यांनी काही दिवसांपूर्वी नेपाळच्या विरोधामागे दुसरा कुणाचातरी हात असल्याचं म्हटलं होतं. आता संरक्षणमंत्र्यांनी सलोख्याची भाषा केल्याने भारताने नेपाळविरोधात समजूतदारपणाची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. भारत आणि नेपाळचे संबंध केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाहीत, तर आध्यात्मिक सुद्धा आहेत. भारत हे कधीच विसरणार नाही. दोन्ही देशांमधील संबंध अतूट आहेत, असंही सिंह यावेळी म्हणाले आहेत. नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी नेहमी भारतविरोधी भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी सीमेवरुन भारतासोबत वाद उकरुन काढला आहे. त्यांनीही आता चर्चेची भाषा केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधीस संबंध पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संविधानात दुरुस्ती करुन आम्ही पहिली प्रक्रिया पार पाडली आहे. आता भारताशी चर्चा करणे हा दुसरा टप्पा असेल. देशाने दाखवलेल्या एकीबद्दल मी खूप आनंदी आहे, असं ओली म्हणाले आहेत. 

जागतिक साथीमुळे आरोग्याचे मोठे संकट

दरम्यान, नेपाळने आपल्या नकाशात बदल करण्याचा कायदा पास केल्यानंतर भारताने सुरुवातीला कडक पवित्रा घेतला होता. नेपाळने आपल्या नकाशात दाखवलेली जास्तीची जागा ऐतिहासिक तथ्याला धरुन नाहीत आणि ते समर्थनीय नाही. तसेच नेपाळची कृती ही सध्याच्या नियमांचे उल्लंघन आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं होतं.

loading image