नदीच्या पाण्यातून कोरोनाचा प्रसार?

गंगा-यमुनामध्ये आढळलेल्या मृतदेहांनंतर खळबळ
Ganga River
Ganga RiverSakal

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा (ganga ) नदीत 70 हून जास्त तरंगणारे मृतदेह (bodies)आढळल्यानं खळबळ उडाली आहे. एकीकडे या मृतदेहाच्या संख्येवरूनही वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. काहींनी ही संख्या 100 पेक्षा अधिक असल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर आता गंगा नदीच्या माध्यमातून कोरोनाचा (covid) प्रादुर्भाव वेगाने पसरेल अशी शक्यता वर्तवत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे मृत शरीरामधून कोरोना पसरले अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. (experts rule out transmission of covid through water after bodies found dumped in ganga yamuna)

नदीत मृतदेह सापडल्यानंतर कोरोना संसर्गाबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या मृत शरीरातून कोरोनाची लागण होण्याविषयीचे काही दावे अनेक तज्ज्ञांना फेटाळून लावला आहे. मात्र, याविषयी आयआयटी कानपूरचे प्राध्यापक सतीश तारे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

"देशावर कोरोनाचं संकट असतांनाच अशा परिस्थितीत गंगा व तिच्या उपनद्यांमधून असे मृतदेह तरंगत येणे हा एक गंभीर प्रकार आहे. कारण, गंगा आणि यमुना या नद्या अनेक गावांचा मुख्य जलस्त्रोत आहेत. तसंच त्यांच्या उपनद्यादेखील जलस्त्रोत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे", असं सतीश तारे म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "नदीत अशा प्रकारे मृतदेह सोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील असे बरेच प्रकार घडले आहे. मात्र, गेल्या १०-१५ वर्षांमध्ये हे प्रमाण कमी झालं होतं. परंतु, असे मृतदेह नदीत सोडल्यामुळे नदीचा मुख्य स्त्रोत प्रदूषित होण्याची शक्यता आहे."

Ganga River
चेहऱ्यावर मास्क लावून कोविडग्रस्त आजींनी केला गरबा

पाण्यामार्फत कोरोना पसरतो का?

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचं मुख्य कारण म्हणजे सूक्ष्म कण. श्वास घेतांना, खोकतांना किंवा शिंकतांना आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात. या लहान दवांना एअरोसोल्स म्हटलं जातं. ते हवेत तरंगत असतात. काही रिपोर्ट्सनुसार, विष्ठेमध्येदेखील कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. मात्र, या विष्ठेमुळे अन्य निरोगी व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, काही तज्ज्ञांच्या मते, शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढतो.

दरम्यान, नदीचं पाणी किंवा स्विमिंग पूलच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरतो याविषयी कोणताही ठोस माहिती समोर आलेली नाही. सध्या तरी हवेतून कोरोनाचा प्रसार वेगाने होतो हेच सिद्ध झालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com