Drunk Police Officer : मद्यधुंद पोलिस अधिकाऱ्याने सहा जणांना उडवलं!, जमावाने बेदम चोपलं

Drunk Police Officer Causes Major Accident : पोलिसांनी घेतलं ताब्यात, गाडीत दारूची बाटली अन् ग्लासही आढळले ; जाणून घ्या, नेमकं कुठं घडली आहे ही घटना?
Drunk Police Officer Causes Major Accident

Drunk Police Officer Causes Major Accident

esakal

Updated on

Drunk police officer accident : दिल्ली पोलिसांच्या मद्यधुंद सहाय्यक उपनिरीक्षकाने (एएसआय) उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात शनिवारी आपल्या गाडीने अनेक लोकांना आणि वाहनांना धडक दिली. या घटनेमुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. आरोपी एएसआयचे नाव सत्येंद्र मलिक, मुझफ्फरनगर, दिल्लीतील मॉडेल टाउन पोलिस लाईन्समध्ये तैनात आहे.

 तर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडीतून रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि ग्लास जप्त केले. या अपघातात सहा जण जखमी झाले, त्यापैकी दोघांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी मोदीनगरमधील निवारी रोडवर एका मद्यधुंद दिल्ली पोलिसांच्या सहाय्यकाने आपली गाडी घेऊन अनेक लोकांवर चिरडल्याने गोंधळ उडाला. तर या पोलिस अधिकाऱ्याची गाडी इतकी वेगात होती की तिने एकापाठोपाठ तीन वाहनांना धडक दिली. त्यानंतर ती अनियंत्रित झालेली गाडी भिंतीवर आदळली. या अपघातात एका तरुणीसह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. .

Drunk Police Officer Causes Major Accident
Hindu youth murdered in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या! ; अमानुषपणे मारहाण करून विष प्यायला भाग पाडलं!

अपघातानंतर संतप्त जमावाने एएसआयला पकडून मारहाण केली. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी एएसआयच्या गाडीची झडती घेतली, तेव्हा त्यात दारूची बाटली आणि ग्लास आढळले. वैद्यकीय तपासणीत एएसआयने दारू प्यायल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपी एएसआयला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या साथीदाराचाही शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com