चिंताजनक! 62 हजारांपेक्षा अधिक लोकांनी गमावला जीव, मृतांच्या आकडेवारीत भारत तिसऱ्या स्थानी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

मागील 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा विक्रमीरित्या वाढला आहे.

कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचल्यानंतर देशातील मृतांचा आकडाही चिंताजनकरित्या वाढला आहे. आतापर्यंत देशात 62635 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील सर्वाधिक मृतांच्या आकडेवारीत मॅक्सिको तिसऱ्या स्थानावर होते. याठिकाणी 62594 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला होता. मॅक्सिकोची जागा आता भारताने घेतली आहे. सर्वाधिक मृतांची नोंद झालेल्या राष्ट्रांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.  

सर्च-रिसर्च : निर्मिती स्मार्ट विटांची !

अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत एक लाख 85 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. ब्राझील दुसऱ्या स्थानावर असून याठिकाणी  एक लाख 19 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतामध्ये जूनपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. देशात मे महिन्याच्या अखेरीस 10 लाख लोकांमागे  पाच जण कोरोनाचे बळी ठरले होते. हा आकडा आता 45 वर पोहचला आहे. 

 24 तासांत आढळले सर्वाधिक रुग्ण  
मागील 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा विक्रमीरित्या वाढला आहे. शुक्रवारीच्या आकडेवारीनुसार, 24 तासांत 76 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 65 हजार 032 लोक बरे झाले आहेत. गुरुवारी  75 हजार 760 नवे रुग्ण सापडले होते. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 34 लाखांहून अधिक असून यातील 26 लाख लोकांनी कोरोनाला मात देखील दिली आहे.  
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जवळपास 4 कोटी लोकांची चाचणी
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत देशात जवळपास  3 कोटी 94 लाख 77 हजार 848 लोकांच्या चाचण्या घेण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यात एक कोटीहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india now number 3 in covid 19 deaths after america and brazil