
नवी दिल्ली: इराण आणि इस्रायल या देशातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने बुधवारी इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' जाहीर केले आहे. इस्रायलने इराणमध्ये केलेल्या लष्करी हल्ल्यांनंतर आणि संघर्षाची व्याप्ती वाढत असल्याने इराणमध्ये तणाव वाढत आहे. भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.