श्रीनगर, ता. ३० ः ऑपरेशन सिंदूरदरम्यान सीमासुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत पाकच्या जम्मू येथील सीमेवरील तब्बल ११८ चौक्या नष्ट केल्या, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पूँच येथे दिली. या कामगिरीबद्दल त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचे अभिनंदनही केले.