
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, सीमावर्ती राज्यांमध्ये सुरक्षेचा स्तर वाढवण्यात आला असून, सामान्य नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून ब्लॅकआउट आणि सायरन प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ज्यावेळी हवाई हल्ल्यांचा धोका असतो, त्यावेळी नागरिकांना सावध करण्यासाठी सायरन वाजवण्यात येतो. सायरन दोनदा वाजतो. पहिला सायरन म्हणजे संभाव्य धोका जवळ येत आहे, त्यामुळे नागरिकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. दुसरा सायरन म्हणजे धोका टळला आहे आणि नागरिक सुरक्षितपणे बाहेर येऊ शकतात.