India-Pakistan War Intensifies: पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताच्या विविध भागात ड्रोन व लढाऊ विमानांनी हल्ले केले. त्यांचे हे सर्व प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडले आहेत आणि आता पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी INS VIKRANT ही सज्ज झाले आहे. भारताकडून पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर येथे हल्ले केले गेले, तर कराची बंदरावरही हल्ले चढवले. त्यामुळे पाकिस्तान सैरभैर झालं आहे. त्यात भारताने हवाई हल्ले केले आहेत आणि त्यापैकी एक बॉम्ब हा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर पडले आहे आणि पाकिस्तानी सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांच्या घराशेजारी स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे पाकिस्तानी चांगलेच घाबरले आहेत.