Pakistan Launches Hamas-Style Missile Attack, Indian Army Responds Strongly: गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने जम्मूमधील सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया आदी प्रमुख सीमावर्ती क्षेत्रांना लक्ष्य करून आठ क्षेपणास्त्रे डागली. भारतीय हवाई संरक्षण दलांनी सर्व क्षेपणास्त्रे रोखली आणि पाकिस्तानची फायटर विमानही पाडली. प्रभावित भागातील रहिवाशांनी मोठ्याने स्फोट आणि आकाशात चमकणारे आवाज ऐकले. यात कोणतीही जीवितहानी किंवा भौतिक नुकसान झाले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पण, पाकिस्तानने हा हल्ला Hamas-style ने केल्याचे समजतेय.