नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर'मधील तिखट माऱ्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरून गेला आहे. दहशतवादी कारवायांमुळे भारताचा रोष ओढावून घेतल्यानंतर पाकिस्तानला आता अंतर्गत असंतोषाच्या उद्रेकालाही तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पाकिस्तानने बुधवार आणि गुरुवारी सीमारेषेनजीकच्या भारताच्या विविध शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारताने आक्रमणाची तीव्रता आणखी वाढवली.