
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ६ मेच्या रात्री पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करत प्रतिउत्तर दिलं. यानंतर पाकिस्ताननेही सीमारेषेवर आणि काही नागरी भागांवर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी जोरदार सैन्य कारवाया सुरू असल्यामुळे आता वातावरण पूर्णपणे युद्धजन्य बनलं आहे.
मात्र याचा अर्थ काय खरंच भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं आहे का? आणि जर युद्ध सुरू झालं असेल, तर त्याची अधिकृत घोषणा कोण करेल?