आता पोस्ट ऑफिस देणार अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

वेबसाइटची संख्या वाढत चालली असताना ई-कॉमर्स क्षेत्रात भारतीय पोस्ट ऑफिसनंही पाऊल ठेवलं आहे. भारतीय पोस्टानं ई-कॉमर्स पोर्टल लाँच केलं आहे. या पोर्टलवरून ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत चांगल्या वस्तू विकत घेता येणार आहे. पोस्टानं ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांना कडवी टक्कर मिळणार आहे.

नवी दिल्ली- वेबसाइटची संख्या वाढत चालली असताना ई-कॉमर्स क्षेत्रात भारतीय पोस्ट ऑफिसनंही पाऊल ठेवलं आहे. भारतीय पोस्टानं ई-कॉमर्स पोर्टल लाँच केलं आहे. या पोर्टलवरून ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत चांगल्या वस्तू विकत घेता येणार आहे. पोस्टानं ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांना कडवी टक्कर मिळणार आहे.

देशातल्या गावागावात पोस्टमन काका जात असल्यानं आपण एखाद्या खेड्यातून मागवलेली वस्तूही घरपोच दिली जाणार आहे. ही पोस्टाची खासियत असणार आहे. त्यामुळे पोस्टाच्या पोर्टलचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. दूरसंचार आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते या पोर्टलचं लाँचिंग करण्यात आलं आहे. या पोर्टलवर पोस्टातील सर्व उत्पादनं मिळणार आहेत. या पोर्टलनं पोस्ट ऑफिस डिजिटल बाजाराशी जोडला जाणार आहे. या पोस्टाच्या पोर्टलवरून मिळणाऱ्या उत्पादनात कपडे, फॅशन व ज्वेलरी, आदिवासींनी तयार केलेली उत्पादनं, बॅग, गिफ्ट आयटम, बास्केट, जैविक उत्पादनं, हँडलूम उत्पादनं, दैनंदिन जीवनात उपयोगाला येणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे.

भारतीय पोस्ट ऑफिसनं आता आपल्याला बँकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे. या सेवा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचाव्यात, त्यासाठी त्यांना ऑनलाइन केल्या आहेत. ग्राहक आता इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सर्व कामे करू शकतात.

Web Title: India Post launches e-commerce portal