भारतात कोविड संसर्गाच्या 'आर व्हॅल्यू'त वाढ; राज्यांची स्थिती काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Corona Cases
भारतात कोविड संसर्गाच्या 'आर व्हॅल्यू'त वाढ; राज्यांची स्थिती काय?

भारतात कोविड संसर्गाच्या 'आर व्हॅल्यू'त वाढ; राज्यांची स्थिती पाहा

नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गाचा वेग निश्चित करणारी रिप्रॉडक्शन व्हॅल्यू अर्थात आर व्हॅल्यू जानेवारीनंतर पहिल्यांदाच एकपेक्षा अधिक झाली आहे. चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्सेसच्या संशोधक सिताभरा सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे. (India R value increases above 1 for first time in 3 months says researcher)

हेही वाचा: दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती; नियमभंग केल्यास ५०० रुपये दंड - सूत्र

सिन्हा यांनी सांगितलं की, गेल्या काही आठवड्यांपासून भारताच्या आर व्हॅल्यूमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. १२ ते १८ एप्रिलदरम्यान ही व्हॅल्यू १.०७ होती, ५ ते ११ एप्रिलदरम्यान ही व्हॅल्यू ०.९३ इतकी होती. तसेच गेल्यावेळी १६ ते २२ जानेवारीदरम्यान ही व्हॅल्यू एक हून अधिक असल्याची नोंद झाली होती. त्यावेळी ही व्हॅल्यू १.२८ झाली होती. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच आर व्हॅल्यूवर नजर ठेऊन असलेल्या सिताभरा सिन्हा यांनी पुढे म्हणाले की, आर व्हॅल्यूमधील ही वाढ केवळ दिल्लीतील वाढत्या रुग्णसंख्येमुळं नाही यासाठी उत्तर प्रदेश आणि हरयाणा सारख्या राज्येही जबाबदार आहेत.

१ ते १० जानेवारीदरम्यान ३ जवळ पोहोचली होती आर व्हॅल्यू

या वर्षी देशातील कोरोनाची सर्वाधिक आर व्हॅल्यू १ ते १० जानेवारी दरम्यान होती. त्यावेळी देश कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळं महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत होता. त्यामुळं ही आर व्हॅल्यू २.९८ इतकी होती.

उत्तर प्रदेश आणि दिल्लीत सध्या आर व्हॅल्यू २ पेक्षा अधिक

सिन्हा यांनी सांगितलं की, मुंबई, बंगळुरु आणि चेन्नई या देशातील मोठ्या शहरांमध्ये आर व्हॅल्यू १ हून अधिक आहे. दिल्ली उत्तर प्रदेशात तर ही व्हॅल्यू दोन हून अधिक आहे. १८ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात दिल्लीची आर व्हॅल्यू २.१२, यूपी २.१२, कर्नाटक १.०४, हरयाणा १.७०, मुंबई १.१८, चेन्नई १.१८ आणि बंगळुरुत १.०४ इतकी राहिली आहे.

जाणून घ्या काय असते आर व्हॅल्यू?

एक संसर्गबाधित व्यक्ती सरासरी किती लोकांना बाधित करते याच आधारावर आर व्हॅल्यू निश्चित केली जाते. यामाध्यमातून विषाणूच्या संसर्गाच्या वेगाचाही अंदाज लावता येतो. तज्ज्ञांच्या मते, आर व्हॅल्यू वाढणं मोठ्या संकटाचा इशारा असतो. एखाद्या ठिकाणी जर आर व्हॅल्यू एक पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ विषाणूच्या संसर्गाची गती मंदावली आहे.

Web Title: India R Value Increases Above 1 For First Time In 3 Months Says Researcher

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top