
नवी दिल्ली : विकसित देशांकडून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने विकसनशील देशांना हवामानविषयक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्याचप्रमाणे, या वर्षीच्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेचे (सीओपी ३०) यशही उत्तरेकडील हे देश हवामानविषयक निधीची वचनबद्धता किती पाळतात, यावर अवलंबून आहे, अशी भूमिका भारताने घेतली आहे.