POK News: पाकव्याप्त काश्मीर आता भारतात येणार? भारतीय लष्कराकडून गुप्त हालचाली

POK News
POK Newsesakal
Updated on

नवी दिल्लीः मागील कित्येक वर्षांपासून पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न खितपत पडला आहे. परंतु आज लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक सूचक विधान केलं आहे. त्यामुळे हा भाग परत मिळविण्यासाठी हालचाली सुरु आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज एक विधान केलंय. पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असं द्विवेदी म्हणाले आहेत.

भारताकडून अशा हालचालींना वेग आलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने याबाबचे वृत्त दिले आहे.

हेही वाचाः गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या उत्तरेकडचा भाग आहे. गिलगिट बाल्टिस्तानचा हा भाग पाकिस्तानच्या अखत्यारित आहे. पीओकेसाठी मागील कित्येक वर्षांपासून भारताचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु इथे आता लष्करी कारवाई होण्याचे संकेत दिसून येत आहेत.

POK News
Gujarat Election 2022: मोदींच्या विरोधातले ते पाच शब्द... जे भाजपच्या विजयाचे शिलेदार बनले

''२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार''

३० जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील एक विधान केलं होतं. २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याची शक्यता असल्याचं त्यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमात सांगितलं होतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर हा नेहमी वादाचा मुद्दा राहिला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये कायम तणावाची स्थिती पाहायला मिळते. त्यात पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com