भारतात कोविड रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ; 1,150 नव्या रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test
भारतात कोविड रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ; 1,150 नव्या रुग्णांची नोंद

भारतात कोविड रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ; 1,150 नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : भारतात गेल्या चोवीस तासात १,१५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळं देशातील अॅक्टिव्ह करोना रुग्णांची संख्या ११,५५८ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रविवारी ही माहिती दिली. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं नागरिकांच्या चिंतेत वाढ होऊ शकते. (India records slight rise in Covid cases with 1150 new infections)

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात चार कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळं कोरोनाच्या एकूण मृत्यूंची संख्या ५,२१,७५१ वर पोहोचली आहे. कालच काही प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. ही रुग्णवाढ १७ टक्के होती. गेल्या चोवीस तासात कालपेक्षा १७५ अधिक रुग्णांची वाढ झाली. त्याचबरोबर कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा ०.३१ टक्के झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटीचा दर ०.२७ टक्के नोंदवला गेला आहे.

हेही वाचा: "वीस वर्षे गायब असलेला जेम्स लेन आजच कसा समोर आला?"

दरम्यान, देशात आत्तापर्यंत १८६.५१ कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवण्यात आल्यानं देशात कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती नियंत्रण आली आहे. पण आता पुन्हा रुग्णवाढ समोर येत असल्यानं चिंतेत भर पडू शकते.

Web Title: India Records Slight Rise In Covid Cases With 1150 New Infections

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top