
भारताने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी केली शिथिल; या खेपांना परवानगी
केंद्र सरकारने (India) मंगळवारी (ता. १७) गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये काही शिथिलता जाहीर केली. जिथे जिथे गव्हाची (wheat) खेप सीमाशुल्क विभागाकडे तपासणीसाठी सुपूर्द केली गेली आहे. ती खेप १३ मे किंवा त्यापूर्वी त्यांच्या सिस्टममध्ये नोंदणीकृत झाली आहे, त्यांना निर्यातीसाठी परवानगी दिली जाईल, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले. (India relaxes ban on wheat exports)
केंद्राने इजिप्तला जाणाऱ्या गव्हाच्या खेपेलाही परवानगी दिली आहे. जी आधीच कांडला बंदरावर लोड होत होती. वास्तविक, यापूर्वी इजिप्त सरकारने कांडला बंदरावर गव्हाचा माल आणण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती.
हेही वाचा: ...अन् पोलिसांच्या उपस्थितीत दुसऱ्या दिवशी पार पडला अपूर्ण विवाह
मेसर्स मेरा इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इजिप्तला गहू (wheat) निर्यातीत (export) गुंतलेल्या कंपनीने ६१,५०० मेट्रिक टन गव्हाचे लोडिंग पूर्ण करण्याची विनंती केली आहे. त्यापैकी ४४,३४० मेट्रिक टन गहू आधीच लोड केला गेला होता आणि फक्त १७,१६० मेट्रिक टन बाकी आहे. सरकारने ६१,५०० मेट्रिक टनाच्या मालाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आणि कांडला ते इजिप्तला जाण्यास परवानगी दिली.
उष्णतेमुळे गव्हाच्या (wheat) उत्पादनावर परिणाम होईल या चिंतेने भारताने मुख्य अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर (export) बंदी घातली आहे. वर्षभरात गहू आणि पिठाच्या किरकोळ किमतीत १४ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे गव्हाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यास आणि शेजारील आणि कमकुवत देशांच्या अन्नाची गरज भागवण्यास मदत होणार आहे.
Web Title: India Relaxes Ban On Wheat Exports
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..