corona update: समाधानकारक; जूननंतर पहिल्यांदाच 24 तासात 10 हजार कोरोना रुग्ण

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 19 January 2021

देशात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे

नवी दिल्ली- देशात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 10,064 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. अनेक महिन्यांनतर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 हजारापर्यंत कमी झाला आहे. मागील 24 तासात 17,411 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 137 लोकांना आपला जीव ममवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे. 

देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,05,81,837 झाली आहे, तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,00,528 आहे. आतापर्यंत 1,02,28,753 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत 1,52,556 लोकांचा बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळतंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india reports 10064 new COVID19 cases 137 deaths in last 24 hours as per Union Health Ministry