कोरोना फोफावतोय! २४ तासात आढळले २.६१ लाख नवे रुग्ण

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून सलग चौथ्या दिवशी दोन लाखांहून जास्त कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत.
कोरोना फोफावतोय! २४ तासात आढळले २.६१ लाख नवे रुग्ण

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून सलग चौथ्या दिवशी दोन लाखांहून जास्त कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. पहिल्या लाटेतही देशात इतके रुग्ण सापडले नव्हते. गेल्या 24 तासात भारतात तब्बल 2 लाख 61 हजार 500 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 1 लाख 38 हजार 423 जण कोरोनामुक्त झाले. शनिवारी (ता.17) 1 हजार 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला एका दिवसात सर्वाधिक 1290 मृत्यू झाले होते.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 कोटी 47 लाख 88 हजार 109 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 1 कोटी 28 लाख 9 हजार 643 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ही 18 लाख 1 हजार 316 असून आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 77 हजार 150 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच आतापर्यंत 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

कोरोना फोफावतोय! २४ तासात आढळले २.६१ लाख नवे रुग्ण
कोरोना, राजकारणी आणि सामान्य माणूस!

महाराष्ट्रात रुग्णांचा आलेख वाढताच

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आलेख अद्यापही कायम आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 67,123 रुग्ण आढळून आले असून रुग्णांच्या बरं होण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.18 टक्के झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात गेल्या चोवीस तासात 67,123 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर 56,783 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. तसेच दिवसभरात 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात सध्या 6,47,933 अॅक्टिव्ह रुग्ण असून आजवर 30,61,174 रुग्णांना रुग्णालयातून यशस्वी उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला असून आजवर 59,970 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना फोफावतोय! २४ तासात आढळले २.६१ लाख नवे रुग्ण
लसीकरणाचे वय २५ वर्षे करा; सोनिया गांधी यांची केंद्राकडे मागणी

मुंबईत 8834 नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत आज 8834 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,70,832 वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा 87,369 हजारांवर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात 53 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 12,294 वर पोहोचला आहे.

पुण्यात 12,836 नव्या रुग्णांची नोंद

पुणे जिल्ह्यात शनिवारी पहिल्यांदाच 12,836 इतके उच्चांकी नवे कोरोना रुग्ण आढळून आले. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 6006 जण आहेत. शनिवारी दिवसभरात 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 54 मृत्यू आहेत. सलग तिसऱ्या दिवशी किमान शंभर किंवा त्याहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 47 हजार 276 जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com